लॉस एंजेलिस - हॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक क्वेंटिन टारनटिनो यांचा 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' हा चित्रपट अलिकडे खूप गाजला होता. हा चित्रपट आपल्यासाठी कास असल्याचे त्यांनी सांगितलंय.
'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' हा चित्रपट १९६९ मध्ये लॉस एंजेलिसला लिहिलेल्या प्रेम पत्तावर आधारित आहे. या चित्रपटाला जगभर प्रेक्षकांनी पसंत केले होते. या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. यात वयस्क अभिनेता रिक डाल्टन ( लियोनार्डो डिकॅप्रियो ) आणि त्याचा स्टंट क्लिफ बूथ ( ब्रॅड पीट ) यांच्या माध्यमातून स्टारडम संपत असतानाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
क्वेंटिन टोरनटिनो यांनी सांगितले, ''हा चित्रपट माझ्यासाठी खूप व्यक्तीगत आहे. मी याला संस्मरणीय म्हणून पाहतो.''