महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 23, 2021, 4:42 PM IST

ETV Bharat / sitara

तापसी पन्नूचे क्रिकेट प्रशिक्षण पुन्हा झाले सुरू!

तापसी पन्नू आता 'शाबाश मितू'च्या शूट साठी तयार होते आहे. तिने तिचे क्रिकेट प्रशिक्षण पुन्हा सुरू केले आहे. ती 'शाबाश मीतू'साठी क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे.

tapsi-pannus
तापसी पन्नू

मुंबई - तापसी पन्नू सध्या एका पाठोपाठ एक चित्रपटांचे चित्रीकरण करीत आहे. नुकतेच तिने 'लूप लपेटा' चे शूट संपविले व आता तो 'शाबाश मितू'च्या शूट साठी तयार होते आहे. तिने तिचे क्रिकेट प्रशिक्षण पुन्हा सुरू केले आहे. काही वर्षांपूर्वी तापसीने 'सूरमा' हा चित्रपट केला होता जो हॉकी या खेळावर आधारित होता. त्यासाठी तिने हॉकीचे प्रशिक्षण घेतले होते. त्या आधी तिने 'नाम शबाना' साठी मार्शल आर्ट्सचे धडे गिरविले होते. आता ती 'शाबाश मीतू' साठी क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे.

तापसीने सूरमा सिनेमासाठी हॉकीचे प्रशिक्षण घेतले होते
तापसी नेहमीच भूमिकेच्या पूर्वतयारीवर भर देते जेणेकरून शूटिंगवेळी त्याचा फायदा होईल. यावेळेस भारताची महिला क्रिकेटची पूर्व कप्तान मिताली राजची टीममेट नूशिन अल खादिर तापसीला क्रिकेट-प्रशिक्षण मदत करीत आहे. नूशिन मितालीची खास मैत्रीण असून तिला मितालीचे सर्व पैलू माहीत आहेत. यामुळे भूमिकेच्या शारीरिक तयारीसोबतच मानसिक तयारीसुद्धा होत आहे. तापसी मितालीची मैदानावरील देहबोली आत्मसात करीत आहे. मिताली आणि तापसी यांची कार्यक्षेत्रे वेगळी असूनही त्या दोघींच्यात बरेच साम्य आहे, असे नूशिन म्हणाली. 'तापसी खूप मेहनती अभिनेत्री आहे. भूमिकेसाठी तिचे व्यावसायिक क्रिकेटरसारखे वागणे वाखाणण्यासारखे आहे. ती स्वतःला पूर्णपणे समर्पित करते व जास्तीत जास्त सराव करून क्रिकेटची देहबोली वर काम करते' असे नूशिन अल खादिर नमूद करते. मिताली राजने महिला क्रिकेट भारतात प्रसिद्ध केले. आता तापसी तिच्या बायोपिकमधून आणखी किती जणांना प्रभावित करते हे बघणे औत्सुक्त्याचे ठरेल. हा चित्रपट भारताची वन डे महिला क्रिकेट कॅप्टन मिताली राजचा बायोपिक असून याचे लेखन प्रिया अवेन यांचे आहे. वायकोम १८ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'शाबाश मितूचे दिग्दर्शन राहुल ढोलाकिया करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details