महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर थिएटर्समध्ये न झळकल्याने तापसी पन्नू नाराज - Lakshmi Bomb latest news

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री तापसी पन्नूला हा ट्रेलर आवडला. परंतु हा ट्रेलर थिएटर्समध्ये न पाहता आल्यामुळे ती नाराज झाली आहे.

Tapsi Pannu
तापसी पन्नू

By

Published : Oct 9, 2020, 5:41 PM IST

मुंबई- अक्षय कुमार, कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेला ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटगृहात न पाहिल्यामुळे तापसी पन्नू निराश झाली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना आपल्या मनातील गोष्ट तिने बोलून दाखवली आहे.

तापसीने ट्विटरवर लिहिलंय, "पुन्हा एकदा तुम्ही चांगले प्रदर्शन केले. खरंतर मी हे सिनेमागृहात पाहिले नसल्याने खूप नाराज झाले आहे."

तथापि, सरकारने 15 ऑक्टोबरपासून थिएटर्स उघडण्यास परवानगी दिली आहे. यावेळी, थिएटरमध्ये एक सीट सोडून बैठक व्यवस्था केली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details