मुंबई - सोनी पिक्चर्स इंडिया आणि एलिप्सिस एन्टरटेन्मेंटने आपल्या आगामी 'लूप लपेटा' चित्रपटाची घोषणा केली आहे. यात तापसी पन्नू आणि ताहीर राज भसीन यांची प्रमुख भूमिका असतील.
जर्मन थ्रिलर फिल्म 'रन लोला रन' या चित्रपटाचा आफिशियल बॉलिवूड रिमेक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश भाटिया करणार आहे. २९ जानेवारी २०२१ ला हा सिनेमा प्रदर्शित होईल.
अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली.
ओरिजनल जर्मन थ्रिलर फिल्म 'रन लोला रन'मध्ये फ्रांका पोटेन्टे (Franka Potente) ने लोला (Lola) आणि मोरिट्ज ब्लेब्त्रू (Moritz Bleibtreu) ने मान्नी (Manni) या प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
हेही वाचा - 'हैदराबाद एन्काऊंटर'वर राम गोपाल वर्मा बनवणार सिनेमा, शमशाबादला केली रेकी
तापसी पन्नू या चित्रपटाशिवाय 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाच्या शूटींगमध्येही बिझी आहे. त्यासोबतच ती भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचा बायोपिक 'शाबास मिथु'मध्येही काम करीत आहे.
ताहीर राज भसीन '८३' या क्रिकेट स्पोर्ट्स ड्रामामध्ये भूमिका करीत आहे. रणवीर सिंग प्रमुख भूमिका करीत असलेला हा चित्रपट १० एप्रिलला रिलीज होणार आहे.