महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा ट्रेलर : 'हर एक मराठा में छुपा है एक लाख मराठा' : 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' - Ajay Devgan latest news

'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तान्हाजी मालुसरेंच्या अफाट शोर्याची गाथा असलेला ट्रेलर तमाम प्रेक्षकांना शिवकालीन वातावरणात घेऊन जाणारा आहे.

तान्हाजी - द अनसंग वॉरियर

By

Published : Nov 19, 2019, 1:49 PM IST

Updated : Nov 19, 2019, 2:43 PM IST


मुंबई - 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आता संपली आहे. कोंढाणा किल्ला सर करणाऱ्या तान्हाजी मालुसरेंच्या अफाट शोर्याची गाथा असलेला ट्रेलर तमाम प्रेक्षकांना शिवकालीन वातावरणात घेऊन जाणारा आहे. यातील अजय देवगणची भूमिका अंगावर शहारे आणणारी आहे, तर सैफ अली खानने साकारलेली उदेभानची भूमिका तगडी टक्कर देणारी आहे.

'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील सर्वच पात्रांचे वेशभूषा, गेटअप साजेसा आहे. किल्ला सर करत असतानाची अचाट अॅक्शन नेत्रदिपक झाली आहे. वीररसाने भरलेले संगीत भारावणारे आहे.

एका छोट्या प्रसंगात दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज पाहताना कुण्याही भारतीयाची छाती अभिमानाने फुलणारी आहे. शिवरायांच्या भूमिकेतील शरद केळकरचा लूक हा सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आहे. तसेच, जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री पद्मावती राव झळकली आहे. काजोल साकारत असलेली सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका प्रेरणादायी वाटते.

बिग बजेट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Last Updated : Nov 19, 2019, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details