हैदराबाद- अभिनेता तमन्ना भाटिया हिने खुलासा केलाय की तिच्या चित्रपटांच्या करारामध्ये ऑन-स्क्रीन किसिंग पॉलिसी नाही. मात्र हा नियम मोडायचा झाला तर तिला कोणाचे चुंबन घ्यायला आवडेल असे विचारले असता तिने तेलुगु स्टार विजय देवराकोंडाचे नाव घेतले.
२०१९ मध्ये फिल्मफेअर (तमिळ) च्या चॅट शोच्या एपिसोडमध्ये तमन्नाने म्हटले होते की, जर तिला हृतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर ती त्याच्यासाठी नियम बदलण्यास तयार आहे. ती म्हणाली होती, "मी ऑन स्क्रिन चुंबन अजिबात घेत नाही. हा खरंच माझ्या चित्रपट कराराचा एक भाग आहे. पण मी माझ्या मित्रांशी विनोदात म्हणाले होते हृतिक रोशन असेल तर माझे हो आहे."
आता असे दिसते की अभिनेत्री तमन्नाच्या मनात बदल झाला आहे कारण तिने कबूल केले आहे की जर कधी चुंबन घेण्याचा प्रसंग आला तर देवराकोंडाचे घेईन.
सॅम जाम (तेलगू) या चॅट शोच्या एका भागात तमन्ना हिला विचारले गेले की, ऑन-स्क्रीन किसिंग पॉलिसी सोडल्यास ती कोणत्या अभिनेत्याचे चुंबन घेईल. तमन्नाने सांगितले की डोळ्याच्या पापण्या न लवता विजय देवेराकोंडा. तिच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.