महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणारा ‘बलोच'! - baloch movie

मराठा इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट आहे 'बलोच'.

‘बलोच'
‘बलोच'

By

Published : Jul 24, 2021, 6:24 AM IST

मुंबई -ऐतिहासिक चित्रपटांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून अनेक धनिक निर्मात्यांनी आपली गाडी ऐतिहासिक चित्रपटांकडे वळविली आहे. मराठीमध्येही चांगले चांगले ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. ‘बलोच’ त्यातीलच एक ज्यात ‘मुळशी पॅटर्न’ वाले प्रवीण तरडे प्रमुख भूमिकेत दिसतील. शिवकालीन चित्रपटांबरोबरच पेशवे आणि पानिपत वर सुद्धा सिनेमे बनताहेत. मराठा इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट आहे 'बलोच'.

नुकतेच ‘बलोच’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टिझर पोस्टरमध्ये पिळदार मिशा, करारी मुद्रा, डोळ्यात धगधगती आग असलेले प्रवीण तरडे दिसत आहेत. त्यांचा हा रांगडा अवतार सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवणारा आहे. जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माता महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या चित्रपटाची कथाही प्रकाश जनार्दन पवार यांचीच आहे. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला ‘बलोच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details