महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एकावं ते नवलचं! तैमुर बाहुल्यानंतर आता कुकीजचीही क्रेझ - star kids

काही महिन्यांपूर्वी तैमुर प्रमाणे दिसणाऱ्या बाहुल्यादेखील बाजारात उपलब्ध झाल्या होत्या.

तैमुर बाहुल्यानंतर आता कुकीजचीही क्रेझ

By

Published : Mar 26, 2019, 5:18 PM IST

मुंबई - बॉलिवूडच्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक लोकप्रिय असलेला स्टारकिड म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरचा 'तैमुर'. त्याच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. त्याला मिळणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीमुळे त्याचे कुटुंबिय जरी चिंतेत असले तरीही त्याची लोकप्रियता कॅश करण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी खेळणी काही महिन्यांपूर्वी बाजारात आली होती. आता तर त्याच्या नावाने कुकीजदेखील बाजारात दाखल झाले आहेत.


एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, कस्टमाईज कुकीज तयार करणाऱया एका बेकरीने तैमुर नावाच्या कुकीजची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान पाहुण्यांना या कुकीज भेट म्हणून देण्यात आली आहेत.


काही महिन्यांपूर्वी तैमुर प्रमाणे दिसणाऱ्या बाहुल्यादेखील बाजारात उपलब्ध झाल्या होत्या. त्यावर करिना संतापली होती. 'हा बाहुला एखाद्या भूताप्रमाणे दिसतो. माझा तैमुर भूतासारखा दिसत नाही', असे ती म्हणाली होती. अलिकडेच शर्मिला टागोर यांनीही तैमुरला मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या प्रसिद्धीमुळे त्याचे बालपण हिरावले जाऊ नये, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, तरीही तैमुरची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
अद्याप या कुकीजसंदर्भात सैफ अली खान आणि करिनाची काही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ते यावर काय प्रतिक्रिया देतात, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details