मुंबई- तैमूर अली खान हा बॉलिवूडचा पॉप्युलर स्टार किड आहे. तो जिथेही जातो तिथे हौशी छायाचित्रकार त्याच्या बाललीला टिपत असतात. यावेळी त्यांच्या नजरेला तैमूर ड्रम वादन करताना दिसला. मग हौशी छायाचित्रकारांनी त्याला आपल्यात कॅमेऱ्यात कैद करायला भरपूर गर्दी केली.
तैमूरचे 'ड्रम वाजवणे' पाहून जमा झाली गर्दी, व्हिडिओ व्हायरल - Kareena latest news
सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान नेहमीच हौशी छायाचित्रकारांसाठी चर्चेचा विषय असतो. यावेळी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात तो ड्रम वाजवताना दिसत आहे.
प्रसिध्द छायाचित्रकार विराल भायानी यांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''पापा सैफ अली खानला गिटार वाजवणे आवडते तर तैमूरला ड्रम वाजवायला आवडतो.''
तैमूर अलीचा हा क्युट व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. यात दिसते की, ड्रम पाहताच तैमूर वाजवायला सुरू करतो. लगेच फोटोग्राफर्सच्या नजरा त्याच्याकडे जातात आणि तैमूर तैमूर अशा हाका मारल्या जातात. तैमूरही त्यांना ड्रम वाजवत फोटोला पोज देतो आणि तिथून निघून जातो. तैमूरच्या या ड्रम वादनाच्या व्हिडिओला हजारो व्ह्यूव्ज मिळाले आहेत.