महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नॅशनल कॅन्सर सर्व्हायवर डे: आपल्या जखमा जगाला दाखवा, ताहिराचं आवाहन - नॅशनल कॅन्सर सर्व्हायवर डे

रविवारी ताहिराने आपली एक कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली. यातून तिने संदेश दिला, की कधीही तुमचे डाग लोकांपासून लपवू नका. हे डागच तुम्ही या लढाईत दाखवलेली ताकद आणि तुमची शक्ती दर्शवतात.

tahira kashyap on scars
नॅशनल कॅन्सर सर्व्हायवर डे

By

Published : Jun 7, 2020, 9:29 PM IST

मुंबई- आज 'नॅशनल कॅन्सर सर्व्हायवर डे' आहे. याच निमित्ताने कर्करोगाचा सामना केलेल्या लेखिका आणि दिग्दर्शक ताहिरा कश्यपने एक कविता शेअर केली आहे. यात तिने कर्करोगाशी लढलेल्या लोकांना अभिमानाने त्यांच्या जखमा दाखवण्याचे आवाहन केले आहे.

ताहिरा अनेकदा तिने कर्करोगासोबत दिलेल्या लढ्याविषयीची माहिती विविध माध्यमांद्वारे देत असते. सोबतच कर्करोगासोबत लढा देणाऱ्या अनेकांना ती प्रेरणा देत असते. रविवारी ताहिराने आपली एक कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली. यातून तिने संदेश दिला, की कधीही तुमचे डाग लोकांपासून लपवू नका. हे डागच तुम्ही या लढाईत दाखवलेली ताकद आणि तुमची शक्ती दर्शवतात.

ताहिराने एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात तिच्या पाठीवर असलेले डाग दिसतात. यासोबतच या व्हिडिओला तिनं तिच्या कवितेचा व्हॉईस ओव्हर दिला आहे. काही जखमा खूप खोल आहेत, काही वरवर तर काही आतमध्ये लपल्या आहेत. या जखमांची एक गोष्ट म्हणजे, या नेहमी तुम्हाला तुमच्या भूतकाळाची आठवण करुन देतात. त्या क्षणांची तुम्हाला शेवटपर्यंत आठवण करुन देत राहतील, असं तिनं कवितेत म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details