महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Lockdown : ताहिराचे 'लॉक डाऊन टेल्स', सांगणार मजेदार किस्से - 'लॉक डाऊन टेल्स

ताहिराच्या मते, लॉक डाऊन हे अनेकांसाठी दोन पर्याय घेऊन आले आहे. एक म्हणजे तुम्ही या काळाचा काही सदुपयोग करा. किंवा मग फक्त तक्रार करत बसा. ताहिरा ने या दोन्ही गोष्टी केल्या. यामधून तिला लॉक डाऊन टेल्सची कल्पना सुचली.

tahira kashyap lockdown tales video
Lockdown : ताहिराचे 'लॉक डाऊन टेल्स', सांगणार मजेदार किस्से

By

Published : Apr 4, 2020, 8:42 AM IST

मुंबई - तहीरा कश्यप खुराना ही फक्त आयुष्मान खुराना ची पत्नी म्हणूनच परिचित नाही. तर, ती एक उत्तम दिग्दर्शिका, निर्माती आणि तसेच लेखिका देखील आहे. आपल्या या कला गुणांनी तिने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी प्रमाणे ताहिरा देखील आयुष्मान सोबत लॉक डाऊनमुळे घरात वेळ घालवत आहे. या काळात तिने काय गमती जमती केल्या, तसेच या वेळेचा तिने कसा सदुपयोग केला, याचे धमाल किस्से ती चाहत्यांशी लॉक डाऊन टेल्सच्या माध्यमातून सांगणार आहे.

ताहिराच्या मते, लॉक डाऊन हे अनेकांसाठी दोन पर्याय घेऊन आले आहे. एक म्हणजे तुम्ही या काळाचा काही सदुपयोग करा. किंवा मग फक्त तक्रार करत बसा. ताहिरा ने या दोन्ही गोष्टी केल्या. यामधून तिला लॉक डाऊन टेल्सची कल्पना सुचली.

ताहिरा लवकरच तिच्या गोष्टी घेऊन सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दैनंदिन आयुष्यातील आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टीबाबत तिने लिखाण केलं आहे.

शुक्रवारी ताहिराने आपल्या या सीरीज मधील पाहिली गोष्ट "6 फुट दूर" अपलोड केली आहे. या सीरिज मधील गोष्टींची कोणतीही निश्चित संख्या नाही. मात्र या गोष्टी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील, असे तिने आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details