महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तापसू पन्नूचा 'लूप लपेता' ठरणार कोरोना विमा संरक्षण लाभलेला पहिला चित्रपट

तापसी पन्नूचा आगामी लूप लपेता हा कोरोनापासून विमा संरक्षण मिळालेला पहिला चित्रपट शरु शकतो ज्यातील सर्व आर्टिस्ट आणि क्रू मेंबर्सचा कोरोना विमा उतरवलेला असेल. बॉलिवूडमध्ये ही नवी प्रथा यामुळे सुरू होऊ शकेल.

Taapsee Pannu'
Taapsee Pannu'

By

Published : Jul 9, 2020, 3:32 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बंद आहेत. शासनाने शूटिंगला काही अटी शर्थींचे पालन करीत दिली असली तरी यातील धोका संपत नाही. अशावेशी कोव्हिड-१९चा विमा उतरवणे हा एक पर्याय होऊ शकतो. तापसी पन्नूचा आगामी लूप लपेता हा पहिला चित्रपट शरु शकतो ज्यातील सर्व आर्टिस्ट आणि क्रू मेंबर्सचा कोरोना विमा उतरवलेला असेल. बॉलिवूडमध्ये ही नवी प्रथा यामुळे सुरू होऊ शकेल.

या चित्रपटाचे निर्माते अतुल कसबेकर आणि तनुज गर्ग यांनी आपल्या सिनेमासाठी कोव्हिड-१९ विमा उतरवण्यासाठी तज्ञांशी बोलायला सुरूवात केली आहे. त्यामुळे लूप लपेता हा चित्रपट विमा संरक्षणासह तयार होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरू शकेल. या चित्रपटात ताहिर राज भसीनचीदेखील प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट टॉम टायवरच्या 1998मधील जर्मन हिट, रन लोला रनचे भारतीय रूपांतर आहे.

“आम्ही अद्याप कायदेशीर तज्ज्ञ आनंद देसाई यांच्याशी चर्चा करीत आहोत. अपघात विमा म्हणून जसा आवश्यक आहे तसाच कोव्हिड-१९चा विमा आवश्यक आहे. चित्रपटाला विमा संरक्षत असणे आवश्यक असते कारण एखादा कलाकार आजारी पडू शकतो किंवा चित्रपटाचे वेळापत्रक बिघडू शकते. कोव्हिड-१९ हा तुलनेने नवीन असल्याने याचा तपशीलावर आम्ही काम करीत आहोत., असे निर्मा अतुल कसबेकर यांनी सांगितले. "उदाहरणार्थ, क्रू मेंबर्सची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली तर संपूर्ण चित्रपटातील क्रू शक्यतो अलग ठेवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत निर्मात्याला वाया गेलेल्या दिवसांच्या पैशांचे संरक्षण मिळू शकेल", असेही त्यांनी सांगितले. कसबेकर यांनी असेही म्हटले आहे, की विमा त्यांच्या कर्मचार्‍यांनाही तितकेच संरक्षण देईल. जर का एखादा क्रू मेंबर कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह निघाला तर त्याची जागा दुसऱ्याला दिली जाणार नाही. लूप लापेटाचे चित्रीकरण एप्रिल आणि मे महिन्यात मुंबई आणि गोव्यात होणार होते. ७० टक्के शूटिंग आऊटडोअर होणार आहे, त्यामुळे या सिनेमाच्या तारखांवर पुन्हा एकदा भरपूर काम करावे लागणार आहे.

हेही वाचा - प्रसिद्ध अभिनेते जगदीप काळाच्या पडद्याआड

कसबेकर यांनी कबूल केले की सध्या या चित्रपटाचे शूट शेड्यूल तात्पुरते आहे. “हा आऊटडोऊर चित्रपट आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही पावसात शूटची जोखीम घेऊ शकत नाही. गोवा पर्यटकांसाठी खुला झाला असला तरी मोठ्या युनिटद्वारे शूटिंग होण्याचा धोका बरीच आहे. मान्सूननंतर आम्ही चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करू शकतोम्हणून जर सर्व काही ठीक राहिले तर कधीतरी दिवाळीनंतर शूट सुरू होईल."

ABOUT THE AUTHOR

...view details