मुंबई - कोविड -१९ अंतर्गत असलेले निर्बंध कमी झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एकापाठोपाठ एक चित्रपटांची प्रतीक्षा करीत आहे. अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटाच्य़ा शुटिंगला सुरुवात करणार्या तापसीने आपल्या इंटरेस्टींग चित्रपटांपैकी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'वो लडकी है कहां' या आगामी चित्रपटामध्ये ती दिसणार असून यामध्ये २०२० चा लोकप्रिय स्टार प्रतीक गांधीदेखील दिसणार आहे.
बातमीनुसार, तापसी एका पोलिसांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर 'वो लाडकी है कहां' चित्रपटात प्रतीक गांधीदेखील झळकणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अर्शद सय्यद करणार आहे.