मुंबई- बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू सांड की आँखनंतर आता आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे. थप्पड असं या सिनेमाचं शीर्षक असून अनुभव सिन्हा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा एक महिला केंद्रित सिनेमा असून तो सर्व भारतीय महिलांना समर्पित असल्याचे अनुभव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
हेही वाचा - शिवराज्याभिषेकाचा भव्यदिव्य थाट, 'हिरकणी' चित्रपटाचं गाणं प्रदर्शित
या सिनेमाची कथा प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि कादंबरी लेखक अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित असल्याचे आता समोर येत आहे. अमृता या पंजाबीतील सर्वात पहिल्या आणि प्रसिद्ध कवयित्री होत्या. तापसीनं चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, जेव्हा कोणी व्यक्ती एखाद्या महिलेची ताकत मान्य करण्यास नकार देतो, याचा अर्थ की तो स्वतःच्या अंतरमनाला नाकारत आहे.
पुढे ती म्हणाली, एका अमृताकडून दुसऱ्या अमृताकडे प्रवास सुरू...मैं तेनु फिर मिलांगी थिएटर में ६ मार्च २०२०. अमृता यांचा प्रवास आणि तपसी पन्नूला पुन्हा एकदा नव्या अवतारात पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असणार आहे. तापसीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचा -'हिमालयाची सावली' नाटकात 'ही' अभिनेत्री साकारणार 'बयो'ची भूमिका