मुंबई- बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तापसी पन्नू लवकरच 'सांड की आँख' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. यानंतर तापसी आणि भूमीने सेटवरील आपले काही फोटोही शेअर केले होते.
'सांड की आँख': तापसीनं शेअर केला प्रकाशी तोमरच्या लूकमधील नवा फोटो - bhumi padnekar
तापसीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रकाशी तोमर यांच्या लूकमधील आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती नव्या नवरीच्या लूकमध्ये दिसत आहे, जिचं वयाच्या २० व्या वर्षी लग्न करण्यात आलं आहे.
अशात आता तापसीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रकाशी तोमर यांच्या लूकमधील आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती नव्या नवरीच्या लूकमध्ये दिसत आहे, जिचं वयाच्या २० व्या वर्षी लग्न करण्यात आलं आहे. वीस वर्षाच्या वयात लग्न, डेटींग लाईफच नाही, मला खात्री आहे. असं कॅप्शन तापसीनं या फोटोला दिलं आहे.
याशिवायही तिनं चित्रपटातील प्रकाशी तोमर यांच्या लूकमधील आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटात तापसी आणि भूमी पेडणेकर प्रसिद्ध महिला शार्पशूटर प्रकाशी आणि चंद्रा तोमर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.