महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तापसी पन्नूने दिले कंगनाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर

अभिनेत्री कंगना रनौतने तापसी पन्नू हिच्यावर टीका केली आणि तिला 'बी-ग्रेड अभिनेत्री' म्हणून संबोधल्यानंतर तापसीने तिला सडेतोड उत्तर दिले आहे. कंगना ज्या लोकांना आपले लक्ष्य बनवत आहे त्यापैकी कोणीही आपला निर्माता नाही, असे तापसीने म्हटले आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कोणाच्या मृत्यूचा फायदा घेत नसल्याचेही तापसीने म्हटले आहे.

Taapsee Pannu
तापसी पन्नू

By

Published : Jul 21, 2020, 3:39 PM IST

मुंबई - अभिनेता कंगना रनौतने तपस्वी पन्नू आणि स्वरा भास्कर या दोघींना 'बी-ग्रेड अभिनेत्री' असे संबोधून नवा वाद निर्माण केलाय. कंगनाच्या या वक्तव्यावर तापसी चांगलीच भडकली असून तिला चोख प्रत्यूत्तर तिने दिले आहे.

एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, "सर्वप्रथम, ती ज्यांच्यावर टीका करीत आहे अशांपैकी कोणीही गँगने तयार केलेल्या चित्रपटात मी काम करीत नाही. मला करण जोहर किंवा इतर कोणी आवडते असे म्हटलेले नाही, परंतु मी हेही म्हटलेले नाही की त्यांचा द्वेष करते. तुम्ही ज्याचा द्वेष करतो त्याचा समोरच्यानेही द्वेष करावा असे असत नाही. करण यांना हाय, हॅलो आणि थँक यूपेक्षा जास्त ओळखत नाही. म्हणून हे कोणत्या तर्कात बसेत?

'तापसी आणि भूमी पेडणेकरांना काम का मिळत नाही?' या कंगनाच्या प्रश्नाचाही ताप्पसीने नंतर चांगलाच समाचार घेतला.

तापसी म्हणाली की, " गेली ३ वर्षापासून ती दरवर्षी चार सिनेमात काम करीत आहे आणि सध्या तिच्या हातात ५ चित्रपट आहेत. म्हणून, कोण म्हणतंय की माझ्याकडे काम नाही? मी माझ्या कारकिर्दीचा ग्राफ हळू आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, आणि जे ठरवलंय तसेच घडतंय.," असे तिने पुढे म्हटले.

हेही वाचा - सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिवस सामान्य होण्यासाठी करतोय प्रतीक्षा, शेअर केला जुना फोटो

तापसी आपल्या बोलण्यात पुढे म्हणाली, ती ज्यांच्यावर आरोप करीत आहे अशा कोणत्याही मुव्ही माफियाने माझे अगोदरचे किंवा होणारे चित्रपट प्रोड्यूस केलेले नाहीत. तर मग माझे अस्तित्व नेपोटिझ्ममुळे आहे हे कशावरुन? किंवा एखाद्याच्या अस्सल कामगिरीची थट्टा करुन तुम्हीच बाहेरुन आलेले यशस्वी आहात हे कसे सिध्द होते?

दरम्यान, वैयक्तिक सूड घेण्यासाठी कुणाच्या तरी मृत्यूचा फायदा घेतल्याबद्दलही तापसीने कडक शब्दात कंगनाला फटकारले आहे.

"वैयक्तिक सूड घेण्यासाठी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा मी घेत नाही. ज्या व्यवसायाने मला नाव आणि अन्न दिले त्याची मी चेष्ठा करीत नाही. मी माझ्या वाट्याचा संघर्ष करीत आहे आणि त्याचे कारण दाखवते आणि त्याच्यासोबत डील करते.,"असे ती म्हणाली.

तापसी पुढे म्हणाली, "हो, मला चित्रपटातून काढून टाकले गेले आहे आणि स्टार किड्सना रिप्लेस केले होते. परंतु तथ्य हेही आहे की ती आणि तिच्या बहिणेने माझ्या हार्डवर्कला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर टीका केली, चुकीचे आरोप केले. जास्त नसेल पण हा शोषणाचा प्रकार होता. मी त्यांच्या सूरात सूर मिसळला नसल्यामुळे हे घडले. कारण मी ती बाहेरच्यांची लीडर आहे हे मान्य करण्यास नकार दिला आहे. आम्ही सर्व कडवट लोक नाहीत."

कंगना आणि तापसी यांच्यात शाब्दिक लढाई होण्याची ही पहिली वेळ नाही. कंगनाची बहीण रांगोली चंदेल हिने तापसीला अभिनेत्रींची 'सस्ती कॉपी' म्हटले होते. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे असा विश्वास तिला वाटतो म्हणून रांगोलीचे वक्तव्य कौतुक म्हणून घेतले जाईल, असे तापसीने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details