मुंबई- अभिनेत्री तापसी पन्नू नुकतीच मिशन मंगल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिनेमाला मिळालेल्या तुफान यशानंतर आता ती 'आर्टिकल १५' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर आता तिनं आपल्या सोशल मीडिया अंकाऊंटवरुन सिन्हांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा - राधिका आपटे वाढदिवस : 'हिरो'च्या कानाखाली मारुन तिने दाखवला होता हिसका
तापसीनं अनुभव सिन्हांच्या या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असल्याची माहिती दिली आहे. थप्पड असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे. याशिवाय हा सिनेमा सामाजिक विषयावर आधारित असणार असल्याची कल्पनाही तापसीच्या पोस्टमधून येत आहे.
तापसीनं काही दिवसांपूर्वीच अनुभव सिन्हांसोबत काम करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यावेळी या सिनेमाचं शीर्षक निश्चित केलं गेलं नव्हतं. दरम्यान, तापसीचा थप्पड हा सिनेमा २०२० मध्ये ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या दिवाळीत ती सांड की आँख चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - आता मिशन 'चांद्रयान ३': शाहरुख खान ते अक्षय कुमार, बॉलिवूडकरांनी दिल्या शुभेच्छा