मुंबई - खेळ दिनाच्या निमित्ताने तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. 'सांड की आँख' या आगामी चित्रपटात्या सेटवरील हे दृश्य आहे. तुषार हिरानंदानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. वयाच्या साठीनंतर हातात रिव्हॉल्वर घेऊन अचूक निशाणा साधणाऱ्या शूटर दादींची ही सत्य कथा आहे. भूमी पेडणेकर चंद्रो तर तापसी पन्नू प्रकाशीच्या भूमिकेत दिसणार आहे.
वय वर्षे ८६ असणाऱ्या चंद्रो तोमर ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून गावात प्रसिद्ध आहेत. त्यांचं नेमबाजीचं कौशल्य पाहिलं की भलेभले तोंडात बोट टाकून त्यांच्याकडे बघत बसतात. आजींनी नेमबाजीच्या २५ राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांत १०० हून अधिक पदकं जिंकली आहेत.