मुंबई- अभिनेत्री तापसी पन्नूची नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली असून ती 'रश्मी रॉकेट' या चित्रपटाचे शुटिंग संपवण्याच्या तयारीत आहे. काही दिवसातच या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात 'हसिन दिलरुबा' या चित्रपटाचे शुटिंग संपवल्यानंतर तिने रश्मी रॉकेटच्या शुटिंगला सुरूवात केली होती.
तापसी 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात एथलिटची भूमिका करीत असून यासाठी तिने कठोर मेहनत घेतली आहे. एथिलिटसारखे शरीर बनवून तिने चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सहभाग घेतला. आता या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचे शुटिंग गुजरातमध्ये पार पडणार आहे.
वृत्तानुसार, 'रश्मी रॉकेट'चे दिग्दर्शक आकर्श खुराना एप्रिल २०२० मध्ये कच्छच्या रणामध्ये रश्मी रॉकेटचे शुटिंग सुरू करणार होते. परंतु कोरोनाची साथ सुरू झाल्यामुळे याचे वेळापत्रक बदलावे लागले. आता कच्छमध्ये शुटिंग करण्यासाठी परवानगी मिळाली असून चित्रपटाची टीम १४ दिवसांसाठी गुजरातला रवाना होईल.
'रश्मी रॉकेट' चित्रपटाची कथा