महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सीबीएसई अभ्यासक्रमातून लोकशाही तत्वांवरील प्रकरणे वगळली; अभिनेत्री तापसी पन्नूने व्यक्त केली नाराजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता 11 च्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, राष्ट्रवाद या विषयांसह इतरही अनेक बाबींवरचे धडे वगळले आहेत. सीबीएसईच्या या निर्णयावर अभिनेत्री तापसी पन्नूने नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू
अभिनेत्री तापसी पन्नू

By

Published : Jul 9, 2020, 8:01 AM IST

मुंबई -बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नू विविध विषयांवर आपली भूमिका ठामपणे नेहमीच मांडत असते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता 11 च्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, राष्ट्रवाद या विषयांसह इतरही अनेक बाबींवरचे धडे वगळले आहेत. सीबीएसईच्या या निर्णयावर अभिनेत्री तापसी पन्नूने नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षणाशी तडजोड केल्यास भविष्य राहणार नाही, असे तीने टि्वटमध्ये म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावर आपली चिंता दर्शविली आहे. कोरोना संकटाच्या वेळी सीबीएसई अभ्यासक्रम कमी करण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने नागरिकत्व, संघराज्यवाद, धर्मनिरपेक्षता सारखे महत्त्वाचे विषय काढून टाकले आहेत, हे पाहून धक्का बसला,” असे बॅनर्जी यांनी ट्विट केले.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीचे तीन महिने वाया गेले आहेत. त्यामुळे उरलेल्या वेळेत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमानुसार फेररचना करून सुमारे 30 टक्के भाग कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाला निशंक यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्याप्रमाणे सीबीएसीने बुधवारी कोणत्या इयत्तेचा अभ्यास कमी केला, याबद्दल बुधवारी जाहीर केले. दरम्यान हा बदल फक्त यंदापूरताच लागू असेल, असेही मंडळाने जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details