मुंबई- बॉलिवूड अभिनेता स्वरा भास्करसोबत यापूर्वी प्रेमसंबंध असलेल्या पटकथा लेखक हिमांशु शर्माने लेखिका कनिका ढिल्लनशी लग्न करायचे निश्चित केले आहे. या जोडप्यांचा एंगेजमेंट कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
आनंदाची बातमी देत कनिका ढिल्लनने इन्स्टाग्रामवर सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. यात दोघांचेही नातेवाईक दिसत आहेत. कनिका आणि हिमांशु खूश असल्याचे इतर फोटोत दिसते.
ही बातमी व्हायरल होताच या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, सोनल चौहान, बधाई हो दिग्दर्शक अमित शर्मा या दिग्गज लोकांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिमांशू शर्माने आजवर तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि रांझना अशा ब्लॉकबस्टरसाठी पटकथा लिहिल्या आहेत. तर कनिकाने मनमर्जियां, केदारनाथ, गिल्टीवर लेखिका म्हणून काम केले आहे आणि सध्या ती शाहरुख खानची भूमिका असलेल्या दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटात काम करत आहे.