महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मृत्यूसाठी शुभेच्छा देणाऱ्या ट्रोलर्सना स्वरा भास्करचे सडेतोड उत्तर - स्वरा भास्कर कोविड पॉझिटिव्ह

कोविड-19 शी लढा देत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिला नेटिझन्सनी शुभेच्छा दिल्या. परंतु अभिनेत्रीला मृत्यूच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्विटने तिची टाइमलाइन भरल्यानंतर नेटिझन्स चक्रावून गेले. अशा ट्रोलर्सना हाताळण्यात स्वरा चांगलीच पारंगत आहे. तिला मृत्यूच्या शुभेच्छा देणाऱ्या 'कीबोर्ड वॉरियर्स'ला स्वराने योग्य उत्तर दिले.

अभिनेत्री स्वरा भास्कर
अभिनेत्री स्वरा भास्कर

By

Published : Jan 8, 2022, 12:25 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री स्वरा भास्करने तिला कोविड-19 ची लागण ( Actress Swara Bhaskar COVID 19 test positive ) झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर, चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. असे असले तरी सोशल मीडियामध्ये तिच्यावर टीका करणारा एक वर्ग आहे. नेहमी प्रमाणे तिच्या कोरोनाच्या बातमीनंतर ट्रोलर्सची गँग स्वरावर तुटून पडली. त्यातील काहींनी तर तिला मृत्यूसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

परंतु अभिनेत्रीला मृत्यूच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्विटने तिची टाइमलाइन भरल्यानंतर नेटिझन्स चक्रावून गेले. अशा ट्रोलर्सना हाताळण्यात स्वरा चांगलीच पारंगत आहे. तिला मृत्यूच्या शुभेच्छा देणाऱ्या 'कीबोर्ड वॉरियर्स'ला स्वराने योग्य उत्तर दिले.

"मी 2022 मध्ये ऐकलेल्या सर्व बातम्यांपैकी सर्वोत्तम बातमी," असे एका नेटिझनने ट्विट केले. "आगाऊ आरआयपी," असे दुसर्‍याने लिहिले. अशा ट्रोल्सवर प्रतिक्रिया देत, स्वराने त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले.

"माझ्या निधनासाठी प्रार्थना करणार्‍या माझ्या प्रिय नफरती चिंटूस आणि ट्रोलर्स.. दोस्तों अपनी भावनाएं काबू में रखो.. मुझे कुछ हो गया तो आपकी रोजी रोटी छीन जायेगी.. घर कैसे चलेगा," असे स्वराने ट्विट केले.

स्वरा भास्करची कोविड-19 चाचणी गुरुवारी पॉझिटिव्ह आली आहे. स्वराने तिच्या पोस्टमध्ये सांगितले होते की, '५ जानेवारी रोजी मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना अहवालात प्राप्त झाला. ज्यामध्ये तिला कोविडची लागण झाली आहे. आम्ही क्वारंटाईनमध्ये राहात आहोत. डोकेदुखी आणि चव कमी होणे ही लक्षणे आहेत. दुहेरी लसीकरण केले गेले आहे, त्यामुळे आशा आहे की हे लवकरच निघून जाईल."

हेही वाचा -Jhimma Movie : ‘झिम्मा’ने सेलिब्रेट केला ‘गोल्डन ज्युबिली डे’!

ABOUT THE AUTHOR

...view details