मुंबई (महाराष्ट्र) - दिवंगत अभिनेता इरफान खानने वाढदिवस लक्षात ठेवण्यावर किंवा साजरा करण्यावर फार विश्वास ठेवला नाही, परंतु त्यांची पत्नी सुतापा यांनी आपला वाढदिवस बहुतेक वेळा विसरल्याबद्दल अखेरीस इरफानला माफ केले आहे.
सुतापा सिकदर यांनी यावर्षी त्यांचा वाढदिवस मुलगा बाबील आणि अयानसह साजरा केला. इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या दिवंगत पतीची आठवण करीत एक भावनिक नोट लिहिली आहे.
सुतपा यांनी आपल्या पोस्टमध्ये इरफान खानच्या वाढदिवस विसरण्याच्या सवयीबद्दल लिहिले आहे. सहजीवनातील ३२ वर्षांपैकी २८ वाढदिवस तो विसरला होता. वाढदिवसाच्या आदल्या रात्री सुतपा सिकदर अस्वस्थ असायच्या. या आठवणी जागवताना त्यांनी लिहिलंय की वाढदिवस साजरा न करण्याची इरफानची फिलॉसॉफी तिने आता स्वीकारली आहे.