मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर हृतिक रोशन आणि त्याची घटस्फोटित पत्नी सुझान पुन्हा एकत्र आले आहेत. ती मुलांसह हृतिकच्या घरी परतली होती. त्यानंतर दोघांच्यामधील संबंध चांगले सुधारत असल्याचे चित्र आहे. हृतिक नेहमी सुझानचे कौतुक करीत असतो. काही दिवसापूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर करुन सुझानविषयी लिहिले होते.
सुझानने आता हृतिकच्या घरी परतल्यानंतरचा आपला अनुभव शेअर केला आहे. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय. तिने आपल्या पॉझिटिव्ह गोष्टींवर मुलाखतीत भर दिला. तिने ही मुलाखत आपल्या इन्स्टाग्रामवर शेअरदेखील केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''घराच्या चार भिंतीच्या आत जे तुम्ही कराल तेच तुमचे सर्वश्रेष्ठ काम समजले जाईल.''
ती मुलाखतीत म्हणाली, ''जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली होती तेव्हाच मी आणि हृतिकने ठरवले होते, की याकाळात आपण मुलांसोबत असणे आवश्यक आहे. तेव्हाच आम्ही ठरवले होते की आपण घरीच राहूयात. प्रेमाने आम्ही लॉकडाऊनची सुरूवात केली.''