मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोमवारी (10 जानेवारी) 48वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने हृतिकचे चाहते त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हृतिकला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्यतिरिक्त अभिनेत्याची माजी पत्नी सुझान खानने यानिमित्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हृतिक त्याच्या दोन्ही मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनेक फोटो आहेत, ज्यामध्ये हृतिक आणि त्याच्या दोन मुलांचे बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे. सुझानने व्हिडिओला 'बेस्ट डॅड एव्हर'चा हॅशटॅगही दिला आहे.
सुझानने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू खूप छान वडील आहेस. रे आणि रिज तुझ्यासाठी खूप भाग्यवान आहेत. तुझी सर्व स्वप्ने आज आणि नेहमीसाठी पूर्ण होवोत."
चाहत्यांच्या शुभेच्छा