महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पती-पत्नी नसलो तरी आजही चांगले मित्र-मैत्रिण, सुझानने उलगडलं हृतिकसोबतचं नातं - divorce

घटस्फोटानंतरही दोघेही आपल्या कुटुंबीयांसोबत एकत्र सुट्टी घालवाताना दिसतात. आता एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत सुझानने हृतिकसोबतच्या आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

सुझानने उलगडलं हृतिकसोबतचं नातं

By

Published : May 4, 2019, 10:34 AM IST

मुंबई- हृतिक आणि सुझान खानने काही कारणांमुळे २०१४ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. २००० मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीने १३ वर्षांने आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. मात्र, असं असतानाही ही जोडी आजही अनेकदा एकत्र स्पॉट होते.

इतकंच नव्हे तर घटस्फोटानंतरही दोघेही आपल्या कुटुंबीयांसोबत एकत्र सुट्टी घालवाताना दिसतात. आता एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत सुझानने हृतिकसोबतच्या आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. आम्ही आता पती-पत्नी नसलो तरी आजही आम्ही चांगले मित्र असल्याचे तिने म्हटले आहे.

इतकंच नव्हे तर हृतिक आजही माझा आधार असून त्याच्यामुळेच मला कधीच एकटेपणाची जाणीव होत नसल्याचे तिने म्हटले आहे. सुझानचे हे वाक्य अगदी खरं आहे, याचा पुरावा वारंवार त्यांच्या फोटोजमधून मिळतच असतो. हृतिकच्या वाईट वेळेतही अनेकदा सुझान त्याच्यासोबत खंबीरपणे उभी असते.

ABOUT THE AUTHOR

...view details