मुंबई- अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खानने मुंबईतील एका कार्यक्रमात सबा आझादच्या अभिनयाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला आहे. हृतिक सबाला डेट करत असल्याची अफवा आहे. सबा ही एक अभिनेत्री, थिएटर दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. डिनर डेटवर एकत्र दिसल्यानंतर क्रिश स्टार हृतिक आणि सबाचा कथित प्रणय गेल्या महिन्याच्या उत्तरार्धापासून चर्चेत आला आहे.
लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014 मध्ये हृतिक आणि सुझान वेगळे झाले होते. परंतु या दोघांमध्ये मजबूत बंध कायम आहेत. दोघे आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सुझान कथितरित्या अर्सलान गोनीला डेट करत असल्याची चर्चा होत असताना हृतिकला सबामध्ये प्रेम असल्याचे दिसते. सबाच्या प्रतिभेचे सुझानने कौतुक केले आहे.