मुंबई - कोरोना वायरसचा प्रर्दुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवस लॉक डाऊनचा निर्णय घेतलाय. सर्व लोकांनी घरी थांबण्याचं आवाहनही करण्यात आलंय. सुझान खानने मुलं एकटी पडू नयेत, यासाठी हृतिकच्या घरी परतण्याचा निर्णय घेतलाय.
हृतिक आणि सुझानच्या मुलांची नावे ऋहान आणि ऋदान अशी आहेत. हृतिक रोशनने आपली एक्स वाईफ सुझानसाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने सुझान सपोर्टिव्ह आणि समजूतदार असल्याचं म्हटलंय. त्याने लिहिलंय, ''अशा वेळी मुलांपासून वेगळे होण्याचा विचार करणे माझ्यासाठी आई-वडिल म्हणून अकल्पनीय आहे. जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनच्या परिस्थितीतून जात आहे.''
त्याने पुढे लिहिलंय, ''खोलवर पसरलेली अनिश्चितता आणि काही महिने सामाजिकदृष्ट्या दूर राहणे, यापासून लॉक डाऊनमुळे जग एकत्र येताना पाहणे हृदयस्पर्शी आहे. जग माानवतेच्या पातळीवर एकत्र येण्याचा विचार करीत आहे. मला वाटते, जे मुलांची कस्टडी शेअर करतात अशा आई-वडिलांसाठी हे कल्पनेहून अधिक आहे. मुलांवर समान अधिकार असलेल्या दुसऱ्या पालकाच्या अधिकाराचे उल्लंघन न करता मुलांना एकत्र कसे ठेवता येईल.''