महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आर्या'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती, सुष्मिता सेननं मानले चाहत्यांचे आभार - आर्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

अभिनेत्री सुष्मिता सेनने आर्या या तिच्या पहिल्या वेबसीरिजमधून पडद्यावर कमबॅक केलं आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला केवळ एका दिवसात 10 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासाठी सुष्मिताने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

aarya trailer response
सुष्मिता सेननं मानले चाहत्यांचे आभार

By

Published : Jun 7, 2020, 10:10 PM IST

मुंबई- अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘आर्या’ या तिच्या पहिल्या वेबसीरिजमधून पडद्यावर कमबॅक केलं आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला केवळ एका दिवसात 10 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासाठी सुष्मिताने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

शुक्रवारी प्रदर्शित झालेला हा ट्रेलर 10 मीलियन प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यास यशस्वी झाला आहे. सुष्मिताने शनिवारी रात्री उशिरा ही गोड बातमी आपल्या फॉलोअर्सला दिली. मला सध्या झोपेची गरज आहे, मात्र मी झोपू शकत नाही. एका दिवसात 10 मिलियन व्ह्यूज, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुष्मिता पोस्टमध्ये म्हणाली, समोरच्यावरचं आपलं प्रेम कसं दाखवायचं हे तुम्हाला माहिती आहे. मी खूप आनंदी आहे. आर्याच्या संपूर्ण टीमच्यावतीने मी तुमचे आभार मानते.

आर्या ही वेबसीरिज 19 जूनपासून डिजनी आणि हॉटस्टारवर प्रसारित केली जाणार आहे. या सीरिजमधून सुष्मिता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री एका अशा स्त्रीची भूमिका साकारत आहे जी आपल्या कुटुंबाला गुन्हेगारीच्या जगापासून वाचवण्यासाठी सर्व सीमा पार करते. राम माधवानी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सीरिजमध्ये नमित दास, मनीष चौधरी, सिकंदर खैर आणि विनोद रावतसह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details