मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने अलीकडेच सोशल मीडियावर आपला प्रियकर रोहमन शॉल याच्याशी ब्रेकअप झाल्याची घोषणा केली. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपबद्दल उघडपणे भाष्य आहे आणि त्याचे खरे कारणही सांगितले आहे. या मुलाखतीत सुष्मिता सेनने ब्रेकअपचे कारण आणि नात्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
एका इंग्रजी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनला ब्रेकअपचे कारण विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, "जेव्हा एखादी व्यक्ती पब्लिक फिगर असते तेव्हा त्या व्यक्तीशी संबंधित सर्व गोष्टींवर लोकांच्या नजरा टिकलेल्या असतात. मग ती व्यक्ती तिथे असो किंवा नसो. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपल्यासोबत जागा दिली आहे, तेव्हा कायम बंधनात राहायचे ही गोष्ट त्या व्यक्तीसाठी आणि तुमच्यासाठीही योग्य नाही. कारण प्रत्येकजण विचार करत असतो आणि ठरवत असतो की हे म्हणजे रिलेशनशीप आहे."