महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतसिंह नव्हता घरच्यांच्या संपर्कात, त्याचा आयपीएस मेव्हुणा मुंबई पोलिसांवर टाकत होता दबाव - Sushant not touch with family

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. त्याचा आयपीएस मेव्हणा मुंबई पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होता. विशेष म्हणजे सुशांतसिंह त्याच्या घरच्यांशी बोलत नसे. सुशांतसिंह राजपूत हा त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात गेल्या काही महिन्यांपासून नव्हता, असं या व्हाट्सअप मेसेज वरुन कळून येत आहे.

Sushant's IPS Sister's husband
सुशांतसिंह राजपूत

By

Published : Aug 5, 2020, 7:57 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. सुशांतचे त्याच्या कुटूंबियांशी पटायचे नाही. तर सुशांतच्या बहिणीचे पती ओ.पी. सिंह यांच्यासोबत सुशांतचे तर अजिबातच पटायचे नाही. सुशांत त्याच्या वडिलांना मेसेस द्वारेच उत्तर द्यायचा ही देखील माहिती समोर आली आहे. सुशांतसिंह याचे रिया चक्रवर्ती सोबत असलेले संबंध त्याचे मेव्हणे ओ पी सिंह यांना आवडत नव्हते. त्यांना वाटायचे या प्रेमप्रकरणांमुळे सुशांत त्याच्या कुटूंबीयांना टाळतोय.

फेब्रुवारी महिन्यात आयपीएस अधिकारी ओ पी सिंग जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी तत्कालीन वांद्रे डीसीपी परमजीत सिंग दाहिया यांच्यावर सुशांतची गर्लफ्रेंड रिया हिच्यावर सुशांत सोबत न राहण्याचा दबाव निर्माण करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी डीसीपी दाहिया यांनी हे कायद्याच्या विरुद्ध असून लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्या शिवाय कारवाई शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

सुशांतची बहिण आणि ओ पी सिंह यांनी सुशांतला चंदीगड येथे येण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत त्याचे विमान तिकिट बुक केले होते. सुशांतसिंह राजपूत हा त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात गेल्या काही महिन्यांपासून नव्हता, असं या व्हाट्सअप मेसेज वरुन कळून येत आहे. सुशांतसिंह राजपूतचा मेव्हणा आयपीएस अधिकारी ओ पी सिंह याने सुशांतसिंहला थेट मेसेज न करता सिद्धार्थ पिठाणी याला काही व्हाट्सअप मेसेज केले होते. जे सिद्धार्थ पिठाणी याने सुशांतसिंह राजपूतला फॉरवर्ड केल्याचं समोर आलेलं आहे. या व्हाट्सअप मेसेजवरुन असे कळते की सुशांतसिंह राजपूतचा मित्र परिवार, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती याबरोबरच सुशांतला असलेल्या सवयींना घेऊन त्याचे कुटुंबीय खूश नव्हते.

काय लिहिले आहे व्हाट्सअॅप मेसेजमध्ये ?

या मेसेजमध्ये सुशांतचा मेव्हण ओ पी सिंह हे म्हणतात की मला मुंबईला बोलविल्या बद्दल धन्यवाद ...सुशांत ने त्याची जवाबदारी घेतली असल्याने आम्हाला बरे वाटत आहे. मुंबईत आल्यावर जुन्या मित्रांना भेटता आले. पुढच्या मेसेज मध्ये ओ पी सिंह म्हणतात की तुझ्या ज्या अडचणी आणि प्रॉब्लम आहेत त्याच्या पासून माझ्या पत्नीला दूर ठेव. या सगळ्या गोष्टी तुझ्या वाईट संगती, चुकीच्या सवई व अनियोजनामुळे निर्माण झाल्या आहेत. तुझ्या मदतीसाठी मी नेहमी हजर असेन मात्र तुझ्या अडचणी तू तिला सांगाव्यात जी तुझ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. तुझी प्रेयसी, तिचे कुटुंब व तुझा मॅनेजर यांच्याकडे तू तुझे म्हणने मांडू शकतोस.

सुशांतसिंह हा त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात नव्हता असं सूत्रांकडून कळत आहे. सिद्धार्थ पिठाणी याने मुंबई पोलिसांना दिलेले व्हाट्सअप मेसेज हे फेब्रुवारी महिन्यातील आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका परिपत्रकानुसार सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असल्याचे म्हटले होते. मात्र सुशांतसिंहच्या वडिलांनी वांद्रे पोलिसांकडे कुठलीही लेखी तक्रार केली नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सुशांतसिंह याचा मेव्हणा आयपीएस अधिकारी ओ पी सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या झोन ९ च्या डिसीपी परमजीत सिंग दाहिया यांना सुशांतसिंहच्या संदर्भात काही व्हाट्सअप मेसेज केले होते. मात्र या संदर्भात स्वतः झोन 9 च्या डिसीपीनी ओ पी सिंह यांना संपर्क साधून या प्रकरणी स्वतः येऊन लेखी तक्रार केल्या शिवाय सुशांतसिंह संदर्भात कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.मात्र हे प्रकरण अनौपचारिक पद्धतीने सोडविण्यात यावे, असे ओपी सिंह यांचे म्हणणे होते, ज्यास मुंबई पोलिसांच्या डिसीपी झोन 9 ने स्पष्ट नकार दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details