मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी मुलाच्या वैद्यकीय उपचारांबद्दल जाणून घेण्यासाठी रिया चक्रवर्ती हिच्याकडे संपर्क साधला होता. व्हॉट्सअॅप मेसेजवरून हे उघड झाले आहे. त्यासंदर्भातले चॅट त्यांनी माध्यमांशी शेअर केले आहेत.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित रियाने त्यांच्या कोणत्याही मेसेजला प्रतिसाद दिला नाही. रियाच्या शिवाय सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या माजी व्यवस्थापक श्रुती मोदी हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिनेही उत्तर दिले नाही. 25 जुलै रोजी पाटणा पोलीस ठाण्यात के. के. सिंह यांनी दाखल केलेल्या खटल्यात श्रुती मोदी सहआरोपी देखील आहे. ती सुशांत आणि रियाची मॅनेजर होती.
सुशांतसिंग राजपूतचे वडील के. सिंग यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये रिया आणि श्रुतीला दिला होता हा निरोप सुशांतच्या मृत्यूची ईडी आणि सीबीआय चौकशी करत आहेत. सुशांत आणि त्याचे कुटुंबीय बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील असून, दोन्ही पोलीस एजन्सींनी बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे तपास हाताळला आहे. के. के. सिंह यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रात्री १२. ३४ वाजता रियाला निरोप पाठवला होता आणि आपल्या मुलाच्या उपचारांचा तपशील शेअर करण्यास सांगितले होते.
रियाला लिहिलेल्या संदेशात सिंह सांगत आहेत, "जेव्हा तुला समजले की, मी सुशांतचा वडिल आहे, तेव्हा तू का बोलली नाहीस. काय प्रकरण आहे. एक मित्र म्हणून तू त्याची काळजी आणि त्याच्यावर उपचार करत असशील तर माझेही कर्तव्य आहे की सुशांतबद्दल मलाही माहिती असायला पाहिजे. त्यामुळे मला कॉल करून सर्व माहिती द्या.''
हेही वाचा -भूमी पेडणेकर आणि बहीण समिक्षा... 'जुळ्या बहिणी?'
सुशांत प्रकरणात श्रुती मोदी, रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे. सुशांतचे वडील सध्या फरिदाबादमध्ये त्यांचे जावई ओ पी सिंह यांच्या घरी राहत आहेत, तिथे सीबीआयने दौरा केला. त्यांनी या प्रकरणात सुशांतचे वडील आणि बहीण यांचा जवाब नोंदवला.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचे म्हटले आहे. तथापी, या प्रकरणात सीबीआय अधिकारी खूप शांत आहेत. सुशांतच्या वडिलांनीही २९ नोव्हेंबर रोजी रियाला मेसेज करण्याच्या दिवशी श्रुती मोदीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, तिने त्यांच्यासाठी मुंबईला येण्यासाठी विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. जेणेकरून ते मुंबईला येऊ शकतील.
सिंह यांनी श्रुती मोदीलान निरोप दिला होता की, "मला माहिती आहे की सुशांतची सर्व कर्ज आणि इतरही तुच पाहतेस. तो आता कशा परिस्थितीत आहे यासंबंधी बोलायचे आहे. काल मी सुशांतशी बोललो होतो. तो खूप अस्वस्थ आहे. ” त्यांनी पुढे लिहिलं, “ आता तू विचार कर की वडीलांना त्याच्यासाठी किती चिंता वाटत असेल. म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं होतं. आता तू बोलत नाही, मला मुंबईला यायचे आहे. फ्लाइट तिकिट पाठवा. "
सुशांतसिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये रिया आणि श्रुती यांना निरोप दिला होता. ईडीने सोमवारी रिया, तिचा भाऊ शोविक आणि वडील इंद्रजित यांचा जवाब नोंदवला आहे. आतापर्यंत ईडीने रियाला दोनदा चौकशी केली आहे, तिचा भाऊ शौविकची तीनदा आणि तिचे वडील इंद्रजीत यांची एकदा मंगळवारी ईडीने चौकशी केली. सुशांतची बहीण मितू सिंह हिलाही एजन्सीकडे आपला जवाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.
ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आज मीतू सिंह आपला जवाब नोंदवतील. इडीने रियाचे चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) रितेश शाह, सुशांतचे सीए संदीप श्रीधर, त्याचे घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी यांचेही जवाब नोंदवले आहेत.
श्रुती मोदी मंगळवारी सकाळी पुन्हा ईडीसमोर हजर झाली. ईडीने यापूर्वी दोनदा चौकशी केली आहे. ३१ जुलै रोजी दिवंगत अभिनेत्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आणि बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, 15 कोटी रुपये काढून मुलाच्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून वर्ग करण्यात आले होते.
ईडीने रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता. सुशांतच्या वडिलांनी रियावर आपल्या मुलाकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे आणि सुशांतला त्याचा मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करण्याची धमकीही रियाने दिली असल्याचा आरोप केला आहे. रियाने दिवंगत अभिनेत्याला त्यांच्यापासून दूर ठेवल्याचा आरोपही या कुटुंबाने केला आहे. हे प्रकरण राज्य पोलिसांकडून 6 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे.