मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्यानंतर नव नवीन गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह संदर्भात चौकशी करण्यासाठी एकूण ५६ जणांचे स्टेटमेंट घेतले होते. यात बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांचाही समावेश होता. महेश भट यांनी त्यांच्या जलेबी या चित्रपटात रिया चक्रवर्ती हिला संधी दिली होती. आता या दोघांचे एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्याने सुशांतसिंहच्या संदर्भात नक्की काय सुरू होते, याबद्दलही काही गोष्टी समोर यायला लागल्या आहेत.
सुशांत व रियाच्या नात्याला घेऊन रियाचे वडील सुद्धा खूश नसल्याचे समोर येत आहे. सुशांतसिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. मात्र , त्या आगोदर ८ जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतचे घर सोडून निघून गेली होती. या संदर्भातील रिया आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल माध्यमांवर सध्या व्हायरल झाले आहे.