महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

केंद्रीय तपास संस्थांकडून एका तरुणीला त्रास दिला जात आहे, कारण.. - रियाच्या वकिलाकडून आरोप - Criticism of Central Investigation Systems

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मादक द्रव्याच्या अँगलमधून चौकशी करणार्‍या एनसीबीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सच्या व्यवहारात तिच्या सहभागाबद्दल तीन दिवसांच्या कठोर चौकशीनंतर रियाला अटक केली. एनसीबीने अटक केल्यानंतर तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणांवर टीका केली आहे.

Rhea was arrested
रियाला अटक

By

Published : Sep 8, 2020, 8:23 PM IST

मुंबई- रियाला मंगळवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केल्यानंतर तिचे वकिल सतीश मानशिंदे यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणांवर टीका केली आणि असे म्हटले की, तिला व्यसनाधीन व्यक्ती आवडत असल्याने एकट्या मुलीला त्रास दिला जात आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मादक द्रव्याच्या अँगलमधून चौकशी करणार्‍या एनसीबीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सच्या व्यवहारात तिच्या सहभागाबद्दल तीन दिवसांच्या कठोर चौकशीनंतर रियाला अटक केली.

रिया चक्रवर्ती यांचे प्रतिनिधीत्व करीत असलेले वकिल मानशिंदे म्हणाले, "केंद्रीय एजन्सी मार्फत एका एकट्या मुलीला त्रास दिला जात आहे. कारण ती अशा व्यक्तीसोबत प्रेम करीत होती जो स्वतः ड्रग्जचा व्यसनी होता आणि मुंबईच्या पाच नामांकित मानसोपचारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार घेत होता. त्याने अवैध औषधे व ड्रगमुळे आत्महत्या केली होती.''

प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात वकिल मानशिंदे यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या नव्या तक्रारीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details