पालघर/वसई :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यासह त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईवर बोलताना पालघरचे पालघरमंत्री दादा भुसे यांनी 'अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे बिहार निवडणुकीपुरतेच चालल्याचे सांगितले. त्यावेळी ज्या लोकांनी आरोप केले, ते म्हणजे सूर्यावर थूंकण्याचा प्रकार होता. त्यावेळीही ते तोंडावर पडले होते. आताही तसाच प्रयत्न केला जात असल्याचे सांगून प्रत्येक चौकशीसाठी शिवसेनेची तयारी असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. वसईतील पालिकेच्या सर डी एन पेट्रीट रूग्णालयाच्या नव्या वास्तूचे भूमीपूजन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा - ETV ETV ETV पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..