महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांत सिंहची आत्महत्या की हत्या याचा लवकरच करणार पर्दाफाश - सीबीआय - सुशांतच्या घरी सीबीआयने केले रिक्रिएशन

सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली यावर सीबीआय पथकाचा शोध सुरू आहे. यासाठी कपूर रुग्णालयात सुशांतचे पोस्टमार्टेम केलेल्या डॉक्टरांच्या टीमला सीबीआय अधिकारी भेटणार असून पाचही डॉक्टरांची चौकशी ते करतील.

Sushant Singh'
सुशांतसिंह राजपूत

By

Published : Aug 22, 2020, 4:49 PM IST

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय मुंबईतइ तपास करीत असून सुशांतची आत्महत्या होती की हत्या याचा आम्ही येत्या काही दिवसात पर्दाफाश करणार असल्याचं सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

याच गोष्टीला अनुसरून सीबीआयची टीम कूपर रुग्णालयाच्या डीनना भेटणार आहे. कूपर रुग्णालयाचे डीन डॉ. पिनाकिन गुज्जर यांची परवानगी घेतल्यानंतर सुशांत सिंहच्या मृत्यू संदर्भात पोस्टमार्टम रिपोर्टवर सह्या करणाऱ्या पाच डॉक्टरांना काही प्रश्न विचारणार आहेत. डॉक्टरांमध्ये असिस्टंट प्रोफेसर डॉ. सचिन सोनवणे , असोसिएट प्रोफेसर डॉ. शिवकुमार कोल्हे , डॉ. सदानंद इंगळे , डॉ. प्रवीण खंदारे आणि डॉ. गणेश पाटील यांना सीबीआय काही प्रश्न विचारणार आहे. या बरोरच सीबीआयची टीम फॉरेन्सिक व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश सुखदेवे यांना यासंदर्भात प्रश्न विचारणार आहे.

दरम्यान सुशांतसिंह राजपूत याच्या बांद्रा स्थित घरी सीबीआयच्या टीम पोहोचली होती. त्या ठिकाणी त्यांनी घडलेल्या घटनेचे रिक्रिएशन केले. सीबीआयच्या पथकासोबत सुशांतसिंह राजपूत याचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा , सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी , कुक नीरज, हाउसकीपिंग मॅनेजर दीपेश सावंत अशा चार जणांना घेऊन सीबीआय टीमने सुशांतसिंहच्या घरी रिक्रिएशन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details