मुंबई -बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्म्हत्या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करीत असून आता पर्यंत ४० पेक्षा अधिक जणांचे जवाब वांद्रे पोलिसांनी नोंदविले आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भन्साळी व यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदविल्यानंतर या संदर्भात बॉलिवूड मधील चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनाही वांद्रे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मंगळवारी वांद्रे पोलीस ठाण्यात राजीव मसंद हजर झाले आहेत.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण : चित्रपट समीक्षक राजीव मसंद पोलीस चौकशीसाठी हजर
सुशांत सिंग राजपूत आत्म्हत्या प्रकरणी आता पर्यंत ४० पेक्षा अधिक जणांचे जवाब वांद्रे पोलिसांनी नोंदविले आहेत. या संदर्भात बॉलिवूड मधील चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनाही वांद्रे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मंगळवारी वांद्रे पोलीस ठाण्यात राजीव मसंद हजर झाले आहेत.
दरम्यान , संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रा यांच्या जबाबात फरक असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. संजय लीला भन्साळी यांना सुशांत सिंग राजपूत याला घेऊन बाजीराव मस्तानी हा चित्रपट बनवायचा होता. मात्र सुशांत सिंग राजपूत याचा यशराजफिल्म्स सोबत करार झाल्याने त्यास काम करता येऊ शकत नव्हते. या संदर्भांत संजय लीला भन्साळी यांनी आदित्य चोप्रा यांच्यासोबत बोलल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र आदित्य चोप्रा यांनी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत कुठल्याही विषयवार बोलणे झाले नसल्याचे म्हटले आहे.
१ वर्षांपूर्वी आदित्य चोप्रा यांनी सुशांत सिंगची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला घेऊन एका अॅड शूटच्या कामासाठी युरोपला गेले होते. या दरम्यान सुशांत संग राजपूत याच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रिया चक्रवर्ती हिने मोठ्या प्रमाणात शॉपिंग केल्याचे बँक स्टेटमेंटवरून समोर आले आहे.