अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सुशांतचा मित्र आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या ओटीटी प्लेटफॉर्मच सबस्क्रीबशन घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांना सुशांतचा हा अखेरचा सिनेमा पाहता येणार आहे.
ट्रेंड पंडित तरन आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि नवोदित संजना संघी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. मुकेश छाबडा यांनीच सुशांतचा नाव त्याचा पहिला वहिला सिनेमा 'काय पो छे' साठी दिग्दर्शक अभिषेक कपूर याना सुचवलं होतं. त्यानंतर सुशांत स्टार झाला. मात्र, या दोघांनी मुकेशचा पहिला सिनेमा एकत्र करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार मुकेश यांच्या 'दिल बेचारा' या दिग्दर्शक म्हणून पदार्पण असलेल्या सिनेमात सुशांतने काम करायला होकार दिला होता.