मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जुलैलै वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. सुंशातच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी एका टि्वटर खात्याद्वारे करण्यात आली होती. हे टि्वटर खाते सुंशात सिंह यांच्या वडिलांच्या नावावर होते. मात्र, सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह ट्विटरवर नाहीत. संबधित खाते फेक असल्याची माहिती राजपूत कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींने दिली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचे ट्विटर खाते फेक ; कौटुंबिक सूत्रांची माहिती - सुशांत सिंह राजपूत
सुंशातच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी एका टि्वटर खात्याद्वारे करण्यात आली होती. हे टि्वटर खाते सुंशात सिंह यांच्या वडिलांच्या नावावर होते. मात्र, सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह ट्विटरवर नाहीत. संबधित खाते फेक असल्याची माहिती राजपूत कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींने दिली आहे.
लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये. सुशांतच्या कुटुंबीयांनी 27 जूनला अखेरचे निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनी कोणतेही निवेदन जाहीर केले नाही. तसेच सुशांतच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेली नाही, असे सुत्रांनी सांगितले.
सुशांतचे चाहते त्याच्या आत्महत्यामागे वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. ते पोलिसांच्या कारवाईवर समाधानी नाहीत. सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी, ही मागणी सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर #CBIMustForSushant ट्रेंड करत आहेत.