मुंबई - सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि प्रशंसकांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. अभिनेत्री कंगना रनौत, शेखर सुमन, रिया चक्रवर्ती हेदेखील या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी आवाज उठवताना दिसले आहेत. आता अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील ही मागणी उचलून धरली आहे.
एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्याने सीबीआय चौकशीचे आवाहन केले आणि सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की सुशांतच्या मृत्यूमागील सत्य शोधून काढले पाहिजे.
दरम्यान, कंगना रनौतने सुशांत मृत्यूप्रकरणी आपला जवाब नोंदवायची असल्याचे उघड केले, परंतु मुंबई पोलीस त्यास प्रतिसाद देत नाहीत. अलीकडेच अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणात कंगनाला तिचे निवेदन नोंदवण्यासाठी लवकरच समन्स बजावतील.