बीजिंग :दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा 'छिछोरे' हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. कॉमेडी-ड्रामा असलेला हा चित्रपट 100 हून अधिक शहरांमध्ये 11 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. चीन हे सर्वात मोठ्या फिल्म मार्केटपैकी एक आहे. आमिर खान स्टारर चित्रपट 'दंगल' 2017 मध्ये चीनमध्ये प्रचंड हिट झाला होता.
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी चित्रपट
छिछोरे हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी भारतात प्रदर्शित झाला. दोन आठवड्यांनंतर, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली. आता 2 वर्षांनंतर हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. याशिवाय वरुण शर्मा, नवीन पॉलिशेट्टी, तुषार पांडे, ताहिर राज भसीन, प्रतीक बब्बर हे कलाकारही या चित्रपटात होते. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे आणि प्रत्येक पात्राला पसंती दिली आहे.
'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार