नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळ ते राजघाटापर्यंत पायी जात असलेल्या सुशांतसिंह राजपूतच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहतूककोंडीचे कारण देत, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. तर इतर दोन जण राजघाटाच्या दिशेने गेले आहेत. अंकित, विजय आणि गणेश असे सुशांतच्या मित्रांची नावे आहेत. यापैकी अंकितला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'राजघाट'च्या दिशेने पायी जाणाऱ्या सुशांतच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात - sushant singh rajput
सुशांतसिंह राजपूतच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहतूककोंडीचे कारण देत, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. तर इतर दोन जण राजघाटाच्या दिशेने गेले आहेत.
सुशांतला न्याय मिळावा, या मागणीसाठी तीघे जण पायी राजघाटाच्या दिशेने जात होते. सीबीआयच्या तपासात काहीच न आढळल्यास धरणे आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. तथापि, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तब्बल 35हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले असून यामध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पीठानी, दिपेश सावंतसह सुशांतच्या परिचयातल्या अन्य व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे.
सुशांतच्या कुटुंबामधील त्याचे वडील के. के. सिंह, त्याची बहीण मितू सिंह, प्रियंका सिंह व मेव्हणे यांचीसुद्धा सीबीआयकडून चौकशी करण्यात आलेली होती. मात्र आता सुशांतसिंहच्या कुटुंबीयांची पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याचेही सीबीआयच्या सूत्रांकडून कळत आहे. सुशांतने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे स्थित घरी आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात बराच वाद निर्माण झाला होता.