मुंबई - सुशांतसिंहच्या निधनानंतर चर्चेला उधाण आले आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहे. लोकांचा एक मोठा समुह ज्याच्यात सेलेब्रिटींचाही समावेश आहे, ते सर्व या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्याच्या निधनानंतर देशाच्या विविध भागातून आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. परंतु सुशांतसोबत काय घडले? असे म्हटले जाते की त्याच्या हातून सिनेमा काढून घेतल्यामुळे त्याचे संतुलन बिघडले होते. जर हे घडले नसते तर सुशांतसिंह राजपूतची गोष्ट वेगळी झाली असती का?
सुशांत 'आशिकी 2' आणि 'सड़क 2'मध्ये काम करण्यासाठी उत्सुक होता. तो महेश भट्ट यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेला होता आणि अनेक ऑडिशन्सही दिल्या होत्या. हा प्रोजेक्ट त्याला मिळेल, अशी अपेक्षा त्याला होती. परंतु शेवटच्या क्षणी दोन्ही चित्रपट आदित्य रॉय कपूरकडे गेले. यामुळे सुशांत नाराज झाला.
'रामलीला' रणवीर सिंहच्या करियरचा टर्निंग पॉईंट होता. यातून त्याचे करियर जमिनीपासून आकाशात झेपावले. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटात रणवीरच्या ऐवजी कोण भूमिका करणार होता? अर्थात सुशांतसिंह राजपूत. राम लीला भन्साळीच्या या सिनेमात तो रामची भूमिका करणार होता. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही.
हेही वाचा - स्पॉटलेस : अॅसिड हल्ल्यावर आधारित आहे सोनू निगमची शॉर्ट फिल्म