नवी दिल्ली- दिवंगत सुशांत सिंह राजपूत याला 'क्रिटिक्स बेस्ट अॅक्टर' म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात रविवारी गौरवण्यात आले. शनिवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला.
सुशांत सिंह राजपूतने २००८ मध्ये 'किस देश में है मेरा दिल' या टीव्ही शोमधून त्याने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तो 'पवित्र रिश्ता' या मालिकेमध्ये अंकिता लोखंडेसोबत झळकला. त्यानंतर त्याचे नाव घराघरामध्ये पोहोचले. टीव्ही मालिकामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याने टीव्ही मालिका सोडली.
२०१३ मध्ये, त्याने 'काइ पो छे' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर आपल्या सहज अभिनयाच्या जोरावर लोकप्रियता कायम ठेवली. त्याच्या या अभिनय कारकिर्दीची दखल घेत 'क्रिटिकचा सर्वोत्कृष्ट अभिनेता' म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार त्याला देऊन गौरवण्यात आले.