नवी दिल्ली :बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिल्यानंतर, आज एजन्सीचे विशेष तपास पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहे.
सूत्रांनी सांगितले की, मुंबईकडे जाणाऱ्या या पथकाचे प्रमुख सीबीआय पोलिस अधीक्षक (एसपी) नुपूर प्रसाद असतील. कोविड-१९ शी संबंधित वैद्यकीय अहवालासह ते मुंबई गाठतील. बिहार पोलिसांच्या पथकाला आठवड्याभरापूर्वी अडचणींचा सामना करावा लागला होता, याची दक्षता हे पथक घेत आहे.
सूत्रांनी असेही म्हटले आहे की मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रे सीबीआय पथक गोळा करेल आणि ते सुशांत प्रकरण हाताळणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनाही भेटतील. गरज भासल्यास हे पथक मुंबई पोलिसांच्या डीसीपीशीही बोलेल ज्यांनी सुशांत प्रकरण हाताळले होते. या अधिकाऱ्यांशी सुशांतच्या कुटुंबाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्याचा जीव धोक्यात असल्याचे सांगून व्हॉट्सअॅप चॅटवरुन शेअर केले होते.
एजन्सीचे अधिकारी सुशांतच्या वांद्रे येथील घरी देखील भेट देऊ शकतात, जिथे तो 14 जून रोजी मृत अवस्थेत आढळला होता. या पथकाने मृत्यूनंतर आलेल्या पाच लोकांना बोलावले आहे. ही टीम सुशांतची बहीण मितू सिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे.