मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सालियान हिने ९ जूनला आत्महत्या केली होती. दिशाने सोमवारी मालाडमधील आपल्या अपार्टमेंटच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारुन आपला जीव दिला. एकाच आठवड्यात सुशांत आणि त्याच्या माजी व्यवस्थापक दिशाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे या दोघांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, याबद्दल तपास सुरू आहे.
वरुण शर्माने त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता, त्याने आपली मैत्रीण आणि माजी मॅनेजर हिचा एक फोटो देखील शेअर केला आहे. अभिनेता लिहितो, 'माझ्याकडे शब्द नाहीत. स्पीचलेस. पूर्णपणे बनावट वाटत आहे. बर्याच आठवणी. खूपच सुंदर व्यक्ती आणि मैत्रीण. तू दररोज सर्व अडचणींना हसत आणि नम्रपणे सामोरे जात होतीस.. मला तुझी खूप आठवण येईल, कुटुंबासाठीधैर्य मिळो ही प्रार्थना. मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की दिशा गेली आहे. खूप लवकर गेली.