महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सडक-२' च्या ट्रेलरला सुशांत प्रकरणाचा फटका, लाईक्स ऐवजी मिळाले लाखो डीसलाईक्स - सडक २ चित्रपटाला विरोध

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महेश भट, आलिया भच्चसह अनेकांवर सुशांतप्रेमींनी टीका केली होती. सडक २ चित्रपटाला विरोध करण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. परंतु ट्रेलरला लाईक करणाऱ्यांपेक्षा डिसलाईक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

sadak-2-trailer
'सडक टू'

By

Published : Aug 12, 2020, 5:21 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा प्रकरणाची राळ शांत होत नाही तोच आज महेश भट यांच्या आगामी 'सडक टू' या सिनेमाचा ट्रेलर हॉटस्टारच्या वतीने सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. मात्र या ट्रेलरला सुशांतच्या चाहत्यांच्या जबरदस्त रोषाला समोर जावं लागलं. अवघ्या काही तासात या सिनेमाच्या ट्रेलरला 58 हजार लाईक्स तर 7 लाखाहून जास्त डीसलाईक्स मिळाले आहेत.

खर तर या गोष्टीचा अंदाज सिनेमाच्या निर्मात्यांनादेखील होता. कारण गेले काही दिवस आधीपासून सोशल मीडियावर #बॉयकोट सडक टू, #बॉयकोट सुशांत कलप्रिट्स, #बॉयकोट आलिया भट, #अनइंस्टोल हॉटस्टार असे काही ट्रेंड्स सुरू झाले होते. त्यातच हा ट्रेलर काल रिलीज करण्यात येणार होता. आधी सकाळी अकरा, मग संध्याकाळी चार मग सहा अस करत करत काल हा ट्रेलर रिलीज करण्यात आलाच नाही. अखेर आज निर्मात्यांनी धाडस करुन हा ट्रेलर रिलीज केला खरा पण या सिनेमाच्या ट्रेलरवर लाईक्स ऐवजी डीसलाईक्सचा पाऊस पडला.

हेही वाचा - अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग;उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

आधीच रिया चक्रवर्ती हिला मदत आणि मार्गदर्शन केल्यावरून या सिनेमाचे दिग्दर्शक महेश भट यांच्यावर सध्या प्रेक्षकांचा प्रचंड रोष आहे. सुशांतच्या मृत्यूमागे महेश भट यांचा हात असल्याचं अनेकांचं मत आहे. त्यात दुसरीकडे त्यात आलिया भट आणि कुणाल रॉय कपूर ही नेपोटीजमचा आरोप होत असलेली दोन दोन स्टार किड्स आहेत. त्यामुळेदेखील सिनेमाच्या ट्रेलरला अनेकांनी आपली नापसंती दर्शवली आहे.

कालच सिनेमातील अजून एक मुख्य कलाकार असलेल्या संजय दत्तला फुफुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे त्याची सहानुभूती या सिनेमाच्या ट्रेलरला मिळेल अस वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. एखाद्या सिनेमाच्या ट्रेलरला किती कमी कालावधीत किती जास्त लाईकस मिळतात हा त्याच्याबद्दल प्रेक्षकांना किती उत्सुकता आहे, याचा मापदंड म्हणून पहिलं जातं. जेव्हा सिनेमा थिएटर मध्ये रिलीज करायचा असतो तेव्हा याबद्दल स्टार्स जास्त सजग असतात. मात्र 'सडक टू' या सिनेमाचा व्यवहार हा यापूर्वीच हॉटस्टार सोबत झालेला आहे. त्यामुळे त्यासाठी लावण्यात आलेले निर्मात्याचे पैसे आधीच वसूल झालेले असल्याने आता लोकांच्या रागाचा फटका कुणाला सहन करावा लागणार असेल तर तो हॉटस्टारला करावा लागणार आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या सुशांतचाच अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' याच हॉटस्टारवर रिलीज झाला होता. या सिनेमाला विक्रमी प्रतिसाद मिळालेला होता. मात्र आता 'सडक टू' या सिनेमाला सुशांतच्या फॅन्सच्या रोशला समोर जावं लागण्याची शक्यता लक्षात घेता त्याचा फटका देखील हॉटस्टारला आणि त्यासोबत या सिनेमाला सहन करावा लागणार आहे हे निश्चित.

ABOUT THE AUTHOR

...view details