नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)च्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा अहवाल दिला आहे. सुशांतची हत्या झालेली नसून ती आत्महत्या असल्याचे एम्सच्या अहवालात म्हटले आहे. शनिवारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सुशांत प्रकरण : एम्सच्या फॉरेन्सिक टीमने दिले आत्महत्येचे संकेत - Sushant case latest news
सुशांत सिंह राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच होती असा अहवाल एम्सच्या फॉरेन्सिक पॅनलने दिला आहे. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा दावा फोल ठरला आहे.
सुशांत प्रकरण
एम्समधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. अशा प्रकारे सुशांतच्या परिवाराने आणि वकिलाने केलेला विष देण्यात आल्याचा आणि गळा घोटून मारल्याचा दावा फोल ठरला आहे.
या प्रकरणाचा अद्याप खटला सुरू असल्यामुळे एम्सच्या डॉक्टरांनी यावर काही भाष्य करण्यास नकार दिला आहे. सीबीआयने अजूनही यावर मौन बाळगले आहे.