महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सीबीआय चौकशीच्या शिफारसीवरून राजपूत कुटुंबीयांना दिलासा, सुशांतच्या भावाची माहिती - Sushant Singh suicide case

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सर्व राजकीय गदारोळानंतर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, ही नक्कीच कुटुंबासाठी आनंद आणि दिलासा देणारी आहे.

Sushant brother
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण

By

Published : Aug 4, 2020, 5:49 PM IST

पाटणा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सीबीआय चौकशीच्या शिफारसीवरून सुशांतच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. सुशांतसिंह राजपूतचे चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार नीरजकुमार बबलू, असे स्पष्टपणे म्हणाले होते की या प्रकरणात केवळ सीबीआय चौकशी केल्यानेच आमच्या कुटुंबाचे समाधान होईल.

राजपूतचे चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार नीरजकुमार बबलू

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद

सुशांतसिंह राजपूत यांचे चुलत भाऊ भाजपचे आमदार नीरजकुमार बबलू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजप नेत्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले आहे की आम्ही सुशांतसिंह प्रकरणाबद्दल सुरुवातीपासूनच सांगत होतो की सीबीआय चौकशी व्हायला हवी.

आता 'दूध का दूध और पानी का पानी' होईल

आमदार म्हणाले की माझा सीबीआयवर विश्वास आहे आणि कुठेतरी सीबीआय आता 'दूध का दूध और पानी का पानी' करेल. ते म्हणाले की, या प्रकरणात कोणाचाही कोणत्याही प्रकारचा संबंध असल्यास, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सीबीआय चौकशी होईल आणि सुशांतला कुठेतरी न्याय मिळेल.

विधानसभेतही सीबीआय चौकशी करण्याची मागणी -

आमदार नीरजकुमार बबलू यांनीही या विधानसभेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच, त्यांच्या पत्नी नूतनसिंह यांनीसुद्धा विधानपरिषदेत सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. सीबीआयला तपासासंदर्भात सर्व पक्षांचे सहकार्य मिळत होते हे निश्चितच आहे. आता सर्व राजकीय गोंधळ उडाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, ही नक्कीच कुटुंबासाठी आनंद आणि दिलासा देणारी बाब आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांची घेतली होती भेट -

वास्तविक, आमदार नीरजकुमार बबलू यांनीही मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितले होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासनही दिले होते. ते म्हणाले की हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल अशी आमची आणि आमच्या कुटुंबीयांची खात्री आहे.

१४ जून रोजी सुशांतने केली होती आत्महत्या -

बिहारमधील अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यानंतर त्याचे कुटुंबीय सतत या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी करत होते. मात्र, तपासात मुंबई पोलिसांनी त्याला आत्महत्या जाहीर केली आहे. परंतु, अनेकांना ती हत्या असल्याचे वाटत आहे.

सर्व राजकीय पक्ष, कुटुंबीय आणि लोकांची मागणी पाहून अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली. यामुळे सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details