मुंबई - भारतीय संस्कृतीमध्ये मुलांनी चांगली व्यक्ती होण्यासाठी कुटुंबावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. घरांमध्ये जे संस्कार होतात, त्यानुसार बहुतांश मुले समाजात वावरत असतात. मुलांना ‘चांगले’ व्हावे याचे बाळकडू आई-वडील, कुटुंबीय यांच्याकडून मिळत असते. परंतु, जर का मुलाचे आई-वडीलच आपल्या मुलाने ‘वाईट’ माणूस बनावे असे ठरविले तर? असेच काहीसे घडलाय शाहरुख खानच्या बाबतीत. नुकतेच त्याच्या मुलगा आर्यन खानला एनसीबी (NCB)ने ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक केली असून त्याला एक दिवसाची NCB कोठडी मिळाली. मोठमोठ्या सेलिब्रिटीजची मुले ड्रग्जचे सेवन का करतात हा सामाजिक प्रश्न असून त्यावर आजपर्यंत तोडगा निघालेला होता.
"तू ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल”
तर शाहरुख खानच्या बाबतीत सांगायचे तर त्याचा २४ वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय. तो आणि त्याची बायको सिमी ग्रेवालच्या शोमध्ये पाहुणे म्हणून गेले होते आणि त्यात आपला मुलगा आर्यन बद्दल सांगताना शाहरुख म्हणाला होता की, ‘आर्यनला मी सांगितले आहे की तू लवकरात लवकर मुलींना डेट करावे इतकं की मुलींच्या पालकांच्या माझ्याकडे तक्रारी यायला हव्यात, तू कितीही जणींबरोबर सेक्स करू शकतोस, तू नशा करू शकतोस अगदी ड्रग्जसुद्धा घेऊ शकतोस. ज्या गोष्टी तरुणपणात मी करू शकलो नाही. त्या तू बिनदिक्कत कराव्यास असा माझा सल्ला आहे. "तू ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल.” या वक्तव्याला त्याची पत्नी गौरीने सुद्धा दुजोरा दिला होता की शाहरुखने आर्यनला खरोखरच असे सांगितले आहे. तसे बघायला गेले तर शाहरुख कदाचित ‘ब्लॅक ह्युमर’मध्ये हे बरळला असेल परंतु, इंटरनेटच्या जमान्यात लोक जुन्या गोष्टी उकरून, खोदून काढून त्यावरून ट्रोल करीत असतात.
'आर्यन ‘चांगल्या’ मुलासारखा वागू लागला तर...'